आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्रीनगर भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणने मान्सूनपूर्वी देखभाल, दुरुस्तीची कामे अजूनही सुरू न केल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. दोन दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करू, असा इशारा श्रीनगर भागातील वीज ग्राहकांनी दिला आहे. महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्तीचे नियोजन आखण्यात येते. पण दरवर्षीच पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाही. सध्या वेगवान वाऱ्यामुळे महावितरणचा बोजवारा उडाला आहे. प्रामुख्याने तारांना अडणाऱ्या फांद्या छाटणे, डीपीमधील ऑइलची लेव्हल तपासणी, फ्यूज पेट्या दुरुस्ती, लोंबकळणाऱ्या व जीर्ण तारांची दुरुस्ती, पोल दुरुस्ती, इंन्सुलेटर्स टाकणे, आर्थिंग तपासणी या कामांचे नियोजन अजूनही झाले नाही. त्यामुळे श्रीनगर व परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा एकमेकांना स्पर्श करतात. परिणामी विजेचा दाब कमी- अधिक होतो. यामुळे विजेवरील उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात दुरुस्ती कामे न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा गणेश पाटील, दामू राणे, रावसाहेब माळी, अमोल पाटील, हेमंत कोळी यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.