आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मुक्ताईनगरात आज हाेणार प्रभू श्रीराम; आदिशक्ती मुक्ताईची महाआरती

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा कार्तिक महिना सुरू असून या महिन्यात हिंदू धर्मात तसेच वारकरी संप्रदायात कथा, कीर्तन व हरिपाठ तसेच काकड आरतीला विशेष महत्त्व असते.

या निमित्ताने आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रभू श्रीराम, विठ्ठल-रुख्मिणी, माता जगदंबा व आदिशक्ती मुक्ताई यांच्या आरती व भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरातील भाविकांना उपस्थितीचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि विविध हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...