आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:धावत्या रेल्वेत फैजपूरच्या प्राैढाचा हृदयविकाराने मृत्यू

अमळनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेने भुसावळहून नंदुरबारला जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकावर फैजपूर येथील ४० वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ.प्रकाश ताडेंनी मृत घोषित केले.

फैजपूर येथील मिल्लत नगरमध्ये राहणारे कय्युम अयुब खान (वय ४०) हे त्यांचा मित्र अर्शद याच्यासोबत गुरुवारी सकाळी ८ वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकातून नंदुरबारकडे जाण्यासाठी निघाले. धरणगावजवळ कय्युम यांच्या छातीत दुखू लागले. तर अमळनेर रेल्वे स्थानकावर त्यांना अधिक त्रास जाणवल्याने त्यांचा मित्र अर्शद यांनी कय्युम खान यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले.

बातम्या आणखी आहेत...