आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशंसा:प्रकाश तेली यांच्या जनजागृती कार्याची पालकमंत्र्यांकडून दखल

पिंपळगाव हरेश्वर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळचे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील कवी तथा पत्रकार प्रकाश तेली यांनी अल्पवयात मतदान जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशंसा केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रकाश तेली यांना १८ ऑक्टोबरला दिले आहे.प्रकाश तेली यांनी मतदान जनजागृतीसाठी ४०० पेक्षा जास्त घोषवाक्य व १५०च्या जवळपास कविता लिहिलेल्या आहेत.

हे एक सामाजिक व राष्ट्रीय कार्य असून समाजाला दिशा व मार्गदर्शन करणारे आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. प्रकाश तेली यांनी चांगल्या प्रकारे मतदार साक्षरता अभियान चालवल्याचे ही पत्रात नमूद आहे. प्रकाश तेली यांनी कविता संग्रह आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कार्य केले आहे ते अद्भुत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त बालविवाह, सडक सुरक्षा, अशा अनेक ज्वलंत विषयांवर जवळपास त्यांचे ५० कविता संग्रह आहेत. त्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे काैतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...