आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसाद:यावलला रविवारी मेस्को माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, महाप्रसाद; शनिवारी शहरातून निघणार शोभायात्रा; सकाळपासून कार्यक्रमास प्रारंभ

यावल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बोरावल रस्त्यालगत मेस्को माता मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी या ठिकाणी सकाळी धार्मिक विधी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. तर रविवारी दुपारी महाप्रसाद वितरण होईल.

शहरात बोरावल रस्त्यालगत असलेल्या मेस्को माता मंदिरात रविवारी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा अक्षय संजय नेवे व भाग्यश्री नेवे या दांपत्याच्या हस्ते होईल. तत्पूर्वी गावातून संजय नेवे यांच्या घरापासून शनिवारी मिरवणूक काढली जाणार असून मंदिरावर समारोप होईल.

रविवारी सकाळपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होईल. दुपारी या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाईल. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाजन गल्लीतील रहिवासी शशिकांत पाटील व संजय नेवे यांनी केले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...