आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा येथून जवळ असलेल्या मस्कावद बुद्रुक येथे रेणुका माता मंदिराचा लोकसहभागातून जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. हे मंदीर १७५ वर्षे जुने आहे. २३ जानेवारीला प्रायश्चित्तादी विधी करुन २४ ते २६ जानेवारीदरम्यान आचार्य प्रवीण राजवैद्य यांच्याकडून प्राणप्रतिष्ठा विधी, ध्वजारोहण, कलशारोहण फैजपूर येथील खंडेराववाडी येथील मनोहर महाराजांच्या हस्ते करण्यात आले. देवीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भारतातील २१ प्रमुख नद्यांचे व चार संगमाचे जल, सागराचे जल, देवीचे साडेतीन पीठे, पावागड, वैष्णोदेवी, सात ज्योतिर्लिंगाचे व अन्य तीर्थक्षेत्राचे अंश आणण्यात आले होते.
या प्रसंगी माहुरगडाचे ट्रस्टी आशिष जोशी व संदीप कान्नव यांनी दर्शन घेऊन माहुरगडतर्फे खण व साडी अर्पण केली. आमदार शिरीष चौधरी व भाविकांनी दर्शन घेतले. मंदिराचा कळस हा मस्कावदच्या भगिनींनी घेतला. मंदिरासाठी विश्वासराव कुलकर्णी, देवेंद्र पाटील, प्रवीण वारके, महेंद्र पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील, तुषार सपकाळे, गणेश सपकाळे, युवराज बऱ्हाटे, नीलेश भिरुड, दीपक डी.पाटील , नीलेश आमोदकर, रघुवीर फालक, कैलास सपकाळे, पिंटू सपकाळे, चंदू पाटील, सुधाकर चौधरी, भावेश चौधरी, नितीन वारके आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.