आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:प्रसन्न ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

अंतुर्ली7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील प्रसन्न ज्येष्ठ नागरिक मंडळ, शिव कॉलनी व ज्येष्ठ नागरिक एल्डर हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये शिवांगी काळे, ज्योती राणे, मनिषा पाटील, मानसी पाटील आणि नगरसेविका दीपमाला काळे यांचा समावेश आहे.

या वेळी मंडळाने तयार केलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीसह चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या चित्र प्रदर्शनीची प्रशंसा करून गौरवोद्गार काढले. त्यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. राज्य फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी.टी. चौधरी यांनी मनोगतात नारीशक्तीचे महत्त्व प्रतिपादन केले. डॉ.रागीब अहमद यांनी मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्पलाइनविषयी मीनाक्षी कोळी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष खान्देश विभागाचे प्रमुख जगतराव पाटील होते.

बातम्या आणखी आहेत...