आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ताप्ती पब्लिक स्कूलचा तिसरीचा विद्यार्थी प्रथमेशसिंग समशेरसिंग (बबलू) ठाकूर याने नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय इको नेपाळ अॅथेलेटिक्स मैदानी स्पर्धा गाजवली. त्याने १०० मीटर धावण्याची स्पर्धा केवळ १५.३६ मिनिटांत पार करून सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे नाशिक विभागातून प्रथमेश हा एकमेव होता. प्रथमेशसिंग ठाकूर याला लहानपणापासून रनिंगची आवड आहे.
नेपाळ येथील पाेकरा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इको नेपाळ अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धेत त्याने सहभाग घेतला हाेता. १ ते ५ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा झाली. त्यात प्रशमेशसिंग याने २ ऑगस्ट रोजी १०० मीटर रनिंग प्रकारात नाशिक विभागातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. त्याला प्रशिक्षक ममता जागिंड यांचे मार्गदर्शन लागले. दरम्यान, रविवारी सकाळी प्रथमेशसिंगचे भुसावळात वडील समशेरसिंग ठाकूर यांच्यासाेबत रेल्वे जंक्शनवर स्वागत करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.