आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथोत्सव:फैजपुरात संत खुशाल महाराजांच्या रथोत्सवाची तयारी; कीर्तन सोहळा

फैजपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल १७४ वर्षांची परंपरा असलेला येथील संत खुशाल महाराजांचा रथोत्सव ७ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. त्यासाठी आतापासून रथाची स्वच्छतेला सुरूवात झाली.श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली. सुरूवातीला लाकडी रथाची पाण्याने स्वच्छता करण्यात आली. रथाची उंची २५ फूट असून लांबी १२ फूट आहे. रथावर गरुड व हनुमान देवतांची मूर्ती व दोन अश्व आहेत. या रथाची निर्मिती श्रीहरी महाराजांच्या काळात झाली आहे.

दरवर्षी नवीन मोगऱ्या बनवण्यात येतात. रथामध्ये पांडुरंग मूर्ती असते. रथोत्सवाच्या तयारीमध्ये संत खुशाल महाराजांचे पाचवे वंशज पुंडलिक महाराज, प्रवीण महाराज व सहकारी व्यग्र आहेत. गुरुवारी रथाला पुढे-मागे ओढून मोगऱ्या लावण्यात आल्या. यावेळी प्रवीण महाराज, मिथिलेश महाराज, संजय जैन, किरण तांबट, डॉ.अमित कुलकर्णी, संकेत तांबट, समाधान मिस्त्री, पराग भारबे, वीरेंद्र जैन, नवल सरोदे, चिराग चौधरी, करण राणा, ऋषिल गोवे, राकेश जैन, कन्हैया इंगळे, हर्षल वायकोळे, किरण मोरे, विक्की जैस्वाल रथ गल्ली मित्र मंडळाने सहकार्य केले.

७ नोव्हेंबरला होणार पूजा : गुरुवारी प्रवीण महाराजांचे सायंकाळी कीर्तन झाले. शुक्रवारी पराग महाराज, शनिवारी भानुदास महाराज, रविवारी योगेश महाराज यांचे कीर्तन होईल. ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता रथाची महापूजा मनीष माहुरकर यांचे हस्ते होईल.

बातम्या आणखी आहेत...