आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफैजपूर येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे ९ ते १६ जानेवारी या काळात, नामसंकीर्तन महोत्सव होणार आहे. त्यासाठी पाच एकरावर १०० बाय २०० फूट आकाराचा मंडप उभारला गेला आहे. महोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे. व्यासपीठ ६० बाय ३० फुटांचे असेल. भोजन मंडपाची तयारी पूर्णत्वास आली आहे. या कार्यक्रमाला श्री क्षेत्र पंढरपूर व श्री क्षेत्र आळंदी येथून वारकरी संप्रदायाचे थोर संत व व गुणिजन गायक, वादक उपस्थित राहणार आहेत. दररोज गायन गंधर्व पंढरीनाथ महाराज आरु यांच्या सुमधुर वाणीतून विठ्ठल नामजप सकाळी ८ ते ११ या वेळेत होईल. दुपारी ३ ते ५ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या समाधी महोत्सवानिमित्त दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत, डॉ जयवंत महाराज बोधले व उमेश महाराज दशरथे यांची कथा प्रवचने होतील. रात्री ८ ते १० कीर्तने होणार आहेत. यासाठी नथुसिंग महाराज राजपूत दौरा मंडळ व वै झेंडूजी महाराज बेळीकर, वै.डिंगमबर महाराज चिनावलकर, आदिशक्ती मुक्ताई, वै.जगन्नाथ महाराज अंजळेकर मठाचे प्रमुख व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.