आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:तांदलवाडी परिसरामध्ये 2 दिवस पावसाची हजेरी; पेरण्यांना गती ; पावसामुळे मिळाले जीवदान

तांदलवाडी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांदलवाडीसह परिसरात शनिवारी रात्री व रविवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला आहे.

शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतशिवार चांगलेच भिजले. रविवारीही सायंकाळी वादळी वारा व त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. कृषी विभागाचा १ जूननंतरच बियाणे विक्री करण्याच्या आदेशामुळे काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत बियाणे खरेदी करून जूनच्या सुरुवातीलाच कपाशीची लागवड केली होती. परिसरात २५ ते ३० टक्के अशाप्रकारे कपाशीची लागवड झाली आहे. त्यामुळे या पिकाला पावसामुळे जीवदान मिळाले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणार; शेतकऱ्यांची माहिती

यावर्षी महागाईने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शेतीत मशागतीची कामे करताना महागाईचा प्रचंड परिणाम झाला आहे. बी-बियाणे, खतांसह मजुरीचेही दर वाढले आहेत. येत्या काही दिवसात मशागतीची कामे आटोपणार असून शनिवारी झालेला पाऊस दमदार होता. मात्र शेतशिवार म्हणावे तसे भिजले नसल्याने पेरणी करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सध्या पेरणीसाठी शेत तयार करण्याचे काम सुरू असून दोन-तीन पवसानंतर जमिनीत पुरेसा ओल निर्माण झाल्यानंतर पेरण्या करू, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...