आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समिती बैठक:कायद्याचे काटेकोर पालन करून धार्मिक सद्भावना जपा : डॉ.सोनवणे

फैजपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रार्थना स्थळांवरील लाउडस्पीकर, भोंग्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत येथील सुमंगल लॉन्स येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता शांतता समिती बैठक घेण्यात आली. त्यात फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी, सर्वप्रथम कायद्याचे पालन करून आपली धार्मिक सद्भावना जपावी व शहरात शांतता कायम राखण्याचे आवाहन केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासह कायदा सुव्यवस्थेसह मंदीर, मशिदींसह इतर प्रार्थना स्थळांचे धर्मगुरू, विश्वस्तांना लाउडस्पीकर, भोंगे याबाबत डॉ.सोनवणेंनी माहिती दिली. याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन लोखंडे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, नितीन चौधरी, विलास महाजन, पवन यादव, कन्हैया महाराज, अमीद काश्मी, करिफ उल जमा आदी मान्यवर उपस्थित होते. या बाबत शहरातील अथवा अन्य व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवर आलेल्या कोणत्याही निराधार गोष्टींना बळी न पडता व अफवांवर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करा, असा सल्लाही डॉ.सोनवणेंनी दिला. यावेळी भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज मेम्बर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, फारूक मनियार, प्रा. राजेंद्र राजपूत, माजी नगरसेवक संजय रल, देवेंद्र साळी, शेख कुर्बान, कलीम खान मनियार, शेख जफर, जलील मेंबर, शेख कौसर, प्रभाकर सपकाळे, राजेश महाजन, गणेश बडगुजर, रामराव मोरे यासह सर्व धर्मगुरू, चालक, मालक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सपोनि आखेगावकर यांनी, सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले. आभार सहाय्यक फौजदार हेमंत सांगळेंनी मानले. पोकॉ बाळू मराठे, राजेश बऱ्हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची समिती नेमून प्रश्न सोडवले जावेत शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे होणारा अडथळा याबाबत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी खंत व्यक्त केली. या बाबत शहरातील सर्व धार्मिक स्थळांचे चालक-मालक यांची एक समिती कार्यरत व्हावी व त्याद्वारे हे सर्व प्रश्न, समस्या शांततामय मार्गाने सोडवल्या जाव्या, अशी अपेक्षाही प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी व्यक्त केली.

डीजेवर बंदी, बाजाराच्या दिवशी मोर्चा, आंदोलनास परवानगी नको
या सभेत कर्णकर्कश डीजेच्या थैमानावर बंदी आणण्याची मागणी तसेच बुधवार हा बाजाराचा दिवस असल्यामुळे या दिवशी कोणत्याही मोर्चा, आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी सूचना संजय सराफ यांनी मांडली. त्यास सर्वांनी सहमती दर्शवली. मौलाना अनस, शेख इक्बाल, रऊफ जनाब यांनीही शहरात अमन, शांती कायम राहण्याची ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...