आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात १ एपिलपासून रेडी रेकनर बाजारमूल्य दर लागू झाले. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नवीन दर पत्रकात शहरातील प्रमुख सहा भागातील निवासी सदनिकांच्या दरात सरासरी ५ ते ७ टक्के वाढ झाली, तर खुल्या जमिनीच्या दरात जामनेर व खडकारोड भाग वगळता यावल, जळगाव व वरणगाव या प्रमुख मार्गांवर दर वाढ झालेली नाही. यामुळे दिलासा मिळाला.
भुसावळ नगरपालिका हद्द, प्रभाव क्षेत्र व ग्रामपंचायत हद्दीतील स्वतंत्र भूखंडावरील बांधकामाचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर असल्याने आरसीसी, लोडबेअरिंग, इतर पक्के व कच्च्या मालमत्तेचे मूल्यांकन कायम असेल. यामुळे या मालमत्तेचा खरेदी- विक्रीचा खर्च वाढणार नाही. विक्रेता व खरेदी करणारे या दोघांनाही कोणतीही अतिरिक्त आर्थिक झळ बसणार नाही. दरम्यान, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सन २०२२-२३ या वर्षात रेडिरेकनर रेट (वार्षिक मूल्य दर तक्ता) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्विड व लॉकडाउनमुळे गेल्या तीन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात वाढ झालेली नव्हती. यंदा मात्र १ एप्रिलपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या निर्णयानुसार भुसावळ शहरातील सदनिका, खुले भूखंड आदींसह बांधकामे आदी मालमत्तेच्या मूल्यांकनात सरासरी ५ ते ७ टक्के वाढ झाली. शहरातील जळगाव रोड, यावल रोड, जामनेर रोड, वरणगाव रोड या प्रमुख भागात ही वाढ झाली. मात्र, असे असले तरी खुली जमीन व दुकानांचे दर मात्र स्थिर आहेत. शहरातील केवळ खडकात रोड भागातील सर्व्हे क्रमांकावरील खुल्या जमिनीच्या दरात काही अंशी वाढ झाली आहे.
सदनिका, फ्लॅट खरेदीवेळी असा बसेल वाढीव भुर्दंड
पूर्वी १ कोटी रुपये शासकीय मूल्य असलेल्या सदनिकेचे शासकीय मूल्य आता १ कोटी पाच ते सात लाखांपर्यंत राहील. या मूल्य वाढीमुळे वाढीव पाच ते सात लाखांच्या रकमेवर खरेदी-विक्री व्यवहार करताना ७ टक्के मुद्रांक व नोंदणी खर्च वाढेल. अर्थात १ कोटी बाजारमूल्याची मिळकत खरेदी करताना पूर्वी ७ टक्के म्हणजे ७ लाख रुपये मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क लागत होते. ते आता पाच टक्के वाढ झालेल्या भागात ३५ हजार तर ७ टक्के वाढ झालेल्या भागात ४९ हजार रुपयांनी वाढेल.
शहरातील केवळ खडका रोडवरील भागात खुल्या जागांच्या दरात वाढ आहे. इतर बहुतांश भागांना दिलासा आहे. सदनिकांचे दर मात्र सर्वच भागात वाढले आहे. सध्या सदनिकांच्या खरेदीकडे अधिक कल आहे.
मुळातच बांधकाम साहित्यांचे दर वाढीमुळे घरे, सदनिकांचे दर वाढले आहेत. आता पाच ते सात टक्के बाजारमूल्य वाढल्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी वाढेल. यामुळे सहाजिकच फ्लॅटचे दर वाढतील.
खुल्या जागेत वाढ झाली नाही. मात्र, पालिका हद्दीत बांधकाम करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळ फ्लॅटला मागणी वाढली. खुल्या जागेत वाढ नसल्याने हे व्यवहार करणाऱ्यांना दिलासा आहे.
राजेंद्र सालकर, मुद्रांक विक्रेते, भुसावळ
दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू
गृहकर्ज घेणाऱ्यांची मर्यादा वाढेल
शासकीय दर ८० टक्के योग्य पद्धतीने मूल्यमापन करुन तयार केले जातात. मात्र, २० टक्के भागात हे दर व्यवहारांपेक्षा अधिक असल्याचे दिसते. यामुळे मुद्रांक व नोंदणी विभागाने योग्य अभ्यास करुन दरनिश्चिती करावी. सध्या वाढलेली महागाई पाहता घर, सदनिका घेण्याकडे नागरिकांचा कल कमी झाला आहे. अनेक जण ८५ ते ९० टक्के रकमेचे गृहकर्ज घेतात. बाजारमूल्य वाढल्याने त्यांच्या कर्जाची रक्कम वाढेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.