आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोव्हेंबर २०२१मध्ये अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून ५ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी या चोरीचा छडा लावत सुरत येथून एका संशयिताला अटक केली. या योग्य तपासाची दखल घेत डीआरएम एस.एस. केडिया यांच्या हस्ते शुक्रवारी तपास करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसच्या ए-१ बोगीतील महिला प्रवाशाची पर्स चोरीला गेली होती. त्यात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून ५ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आरपीएफ निरीक्षक आर.के.मीणा यांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात आढळलेला संशयित रिक्षाने जाम मोहल्ल्यात गेल्याचे समजले. यानंतर आरपीएफ जवानांनी जाम मोहल्ला गाठला. मात्र, संशयित सुरत येथील असल्याचे समजले. त्यानुसार आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने सुरत येथील आरोपीला अटक केली होती. सहायक उपनिरीक्षक प्रेम चौधरी, संदीप चौधरी, भूषण पाटील आणि कैलास बोडके यांनी या गुन्ह्याचा तपास लावला. त्यांचा शुक्रवारी डीआएम एस.एस.केडिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरव झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.