आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा निवडणे सुरु केले आहे. त्यात अनेकांचा कल अभियांत्रिकीकडे आहे. रोजगाराच्या संधी पाहता मॅकेनिकल, स्थापत्य, विद्युत, संगणक या विभागांसोबत दोन वर्षांपासून नव्याने आलेल्या आर्टीफिकेशल इंटेलिजंट, डेटा सायन्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनबद्दल विचारणा होते. या क्षेत्रातील संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. असे गाडगेबाबा अभियांत्रिकीचे प्रा.गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
मेकॅनिकल : पायाभूत शाखा कायनामेटिक्स, स्ट्रक्चरल अॅनालिसिस, थर्मोडायनामिक्स, फ्लुईड मेकेनिक्स, ऊर्जाक्षेत्र, रेफ्रिजिरेशन आणि एअर कंडिशनिंग, थ्री डी प्रिंटिंग आणि वाहन उद्योगाशी निगडित क्षेत्रात संधी उपलब्ध करते. कटिआ, प्रोई, हायपरमेश आणि एन्सिस अशा सॉफ्टवेअरच्या अभ्यासामुळे मेकॅनिकल अभियंत्यांना डिझाइन आणि सिम्युलेशन, आयटीमध्ये सुद्धा संधी उपलब्ध होतात.
इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन : इलेक्ट्रॉनिक्स विषयांबरोबर मायक्रो कंट्रोलर, मॅटलॅब, पायथॉन या अभ्यासक्रमातील अंतर्भाव आंतरशाखीय विभागांमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून देतो. कोअर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन क्षेत्र, आय.टी, सॅटेलाइट कम्युनिकेशन, ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टम, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक क्षेत्रात संधी आहेत.
विद्युत : ही पायाभूत शाखा वीजनिर्मिती, वीज वहन व वीजपुरवठा तसेच यंत्र निर्मिती, दळणवळणाची साधने, उपकरणे, कम्युनिकेशन्स ची साधने, आयटी तसेच सरकारी, सार्वजनिक, खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करते. विद्युत अभियंता विद्युत यंत्र व उपकरणे निर्मिती, देखभाल, सेवा, सल्ला इ. संदर्भात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
स्थापत्य : स्वतःचा उद्योग किंवा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करवते. राज्य शासनाच्या विविध विभागात जसे की पीडब्ल्यूडी, सिंचन, जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, महानगरपालिका, टाऊन प्लानिंग व केंद्र शासनाच्या पोस्ट, रेल्वे, सीडब्ल्यूसी, डिफेन्स, निम्न शासकीय विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
संगणक : संगणकाशी निगडीत हार्डवेअर, डिझाईन, सॉफ्टवेअर तयार करणे, त्यांची देखभाल इत्यादी क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होते. वाढत्या तंत्रज्ञानामुळे संगणकाशी संबंधित विविध क्षेत्रात त्यांना करिअरची संधी आहे.सॉफ्टवेअर उद्योगात वाढ होत असल्याने जगातील नामांकित बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये नियमित भरती असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.