आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग विस्तारीकरण:एमआयडीसीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर अडचणी‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गाचे विस्तारीकरण करताना भुसावळ‎ एमआयडीसीला जोडणाऱ्या शिवपूर कन्हाळे‎ चौफुलीवर अंडरपास झाला. मात्र अंडरपासची‎ उंची कमी असल्याने एमआयडीसीत जाणाऱ्या व‎ येणाऱ्या वाहनांना खडका चौफुलीवरुन वापरावे‎ लागते. हा मार्गदेखील अंत्यत अरुंद असल्याने‎ अवजड वाहनांना तारेवरची कसरत करुन‎ एमआयडीसी गाठावी लागते. यामुळे‎ जामनेररोडवरील खेडी शिवारातून स्वतंत्र मार्ग‎ तयार होणे गरजेचे आहे.‎ भुसावळात खडका, शिवपूर कन्हाळे व‎ खडका शिवारातील एमआयडीसीच्या झपाट्याने‎ विकास होत आहे. सध्या सुमारे १५० लहानमोठे‎ उद्योग सध्या सुरु झाले आहेत. महामार्गाचे‎ चौपदरीकरण झाल्यानंतर एमआयडीसीला‎ जोडणाऱ्या शिवपूर कन्हाळे मुख्य मार्गावरील‎ अंडरपास उभारणी झाली. यात त्याची उंची‎ अवघी पाच ते साडेपाच मीटर आहे. यामुळे‎ अवजड वाहने व कंटेनर यातून जाऊ शकत नाही.‎

बातम्या आणखी आहेत...