आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:साकेगावात 2 बंद घरे फोडून‎ 79 हजारांचा मुद्देमाल लंपास‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील साकेगाव शिवारातील‎ दोन बंद घरांमधून चोरट्यांनी ७९‎ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या‎ प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात‎ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल झाला.‎ साकेगाव शिवारातील खालसा‎ हॉटेल मागील गट क्रमांक २३३ अ‎ मध्ये पीतांबर सुकलाल हिवरकर हे‎ वास्तव्यास आहेत. हिवरकर घरी‎ नसल्याची संधी साधून चोरट्यांनी १‎ ते २ जानेवारीदरम्यान घरातून ३५‎ हजारांची रोकड, २४ हजारांचे‎ सोने-चांदीचे दागिणे, ७ हजार रुपये‎ किंमतीचे २ मोबाइल लांबवले.‎ समाधान कुंभार यांच्या घरातून ९‎ हजारांची रोकड, दोन हजारांच्या‎ चांदीच्या पाटल्या, दोन हजार रुपये‎ किमतीचा मोबाइल असा एकूण ७९‎ हजारांचा ऐवज लांबवला. या‎ प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत‎ हिवरकर यांच्या तक्रारीवरून‎ घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात‎ आला. तपास पोलिस निरीक्षक‎ विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ हवालदार संजय भोई करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...