आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:निंभोऱ्यात बंद घरातून दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निंभोरा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला.सचिन आत्माराम तायडे (वय ४३) हे निंभोरा बुद्रूक दीपनगर येथील हॉटेल त्रिमूर्ती मागे राहतात. ते कामानिमित्त परिवारासह गावाला गेले होते.

ही संधी साधून चोरट्यांनी १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. यानंतर बेडरूममधील रेक्झिन पिशवीतील सोन्या-चांदीचे दागिणे, देवाच्या मूर्ती, देवघरातील देवतांच्या चांदीच्या मूर्ती, रोकड, नवे-जुने कपडे तसेच स्टीलचे भांडे मिळून १ लाख ८१ हजार ५९ रुपयांचा ऐवज लांबवल्याचे उघड झाले.

बातम्या आणखी आहेत...