आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 किमी अंतरावरून धावतात:परस्पर जाणाऱ्या 14 रेल्वे गाड्यांसाठी कॉर्डलाइनवर फलाटनिर्मितीचा प्रस्ताव

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ रेल्वे जंक्शनपासून पूर्वेकडे दोन किमी अंतरावर झेडटीसी परिसरात कॉर्ड लाइन आहे. या काॅर्ड लाइनवरून २४ तासांत अप-डाऊन मार्गावरील मिळून १४ गाड्या ये-जा करतात. यापैकी एकही गाडी भुसावळ रेल्वे स्थानकापर्यंत येत नाही. त्या कॉर्डलाइनवरून परस्पर ये-जा करतात. यापैकी कोणत्याही गाडीने प्रवास करायचा म्हटल्यास भुसावळ शहर व परिसरातील किमान १४०० प्रवाशांना मलकापूर किंवा खंडवा स्थानक गाठावे लागते. यामुळे होणारी गैरसोय पाहता कॉर्ड लाइनवर प्लॅटफार्म बांधणीसाठी महाव्यवस्थापकांकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. दुसरीकडे ही परवानगी न मिळाल्यास या सर्व गाड्यांना वरणगावला थांबा देता येईल का? या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. भुसावळ रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या झाेनल ट्रेनिंग सेंटरजवळ खंंडव्याकडे जाणारी काॅडलाइन आहे.

काॅर्ड लाइनवरून धावणाऱ्या गाड्या ०७११५ हैद्राबाद-जयपूर एक्स्प्रेस, १२७२० हैद्राबाद-जयपूर एक्स्प्रेस, १२४२१ नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस, २२७०९ नांदेड-आंबअंदाैरा एक्स्प्रेस, १२४३९ नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस, १२४८५ नांदेड-गंगानगर एक्स्प्रेस, २२४५७ नांदेड-अंदाैरा एक्स्प्रेस अशा अप-डाऊनच्या मिळून एकूण १४ गाड्या भुसावळजवळील काॅर्डलाइनवरून धावतात.

बडनेरा येथे ६ गाड्या कॉर्डलाइनवरून केवळ भुसावळच नव्हे तर भुसावळ विभागातील बडनेरा स्थानकावर देखील हीच गत आहे. बडनेरा स्थानकावर न जाता काॅर्ड लाइनवरून ६ गाड्या धावतात. १२१६० जबलपूर-अमरावती एक्स्प्रेस, १२१२० अजनी-अमरावती एक्स्प्रेस आणि ०१३७२ मेमू गाडी अशा या तीन (अप-डाऊन मिळून ६) गाड्या आहेत. त्यांचा तेथील प्रवाशांना लाभ होत नाही.

वरिष्ठांच्या आदेशानुसार काॅर्ड लाइनला गाडी थांबवणे किंवा प्लॅटफाॅर्म तयार करणे, हे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाहीत. यासाठी मध्य रेल्वे महामव्यवस्थापकांकडे प्रस्ताव पाठवू. त्यांच्या आदेशानंतर पुढील दिशा ठरेल. - डाॅ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ वाणिज्य मंडळ व्यवस्थापक, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...