आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:बसस्थानक नूतनीकरणाचा प्रस्ताव

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बसस्थानकाची स्थिती अत्यंत बिकट आहे. गत काळात येथे बसपोर्टचे प्रयत्न झाले होते. मात्र, राज्यातील सत्तांतराच्या वेगवेगळ्या घटनाक्रमामुळे तूर्त हा मुद्दा बाजूला पडला. आता स्थानिक एसटी प्रशासनानेच बसस्थानक नूतनीकरणाचा प्रस्ताव महामंडळाला दिला आहे. त्यावर निर्णय झाल्यास प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होईल.

रेल्वे जंक्शन स्थानकाला लागूनच भुसावळचे बसस्थानक आहे. त्यामुळे दिवसभरात हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, दशकभरापासून बसस्थानकाची स्थिती बिकट झाली आहे. आवारात साचणारे पावसाचे पाणी, तुटलेले बाकडे, फरशा, बंद पडलेले पंखे, दिवे आणि कमालीची अस्वच्छता, बेशिस्त पार्किंग डोकेदुखी ठरते. या बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी स्थानिक भुसावळ आगाराने एसटीच्या जिल्हा वाहतूक नियंत्रकांकडे बांधकामाचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव जिल्हास्तरावरून महामंडळाकडे पाठवला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास स्थानकाचे रुपडे पालटून प्रवाशांना सुविधा मिळतील.

टचिंग पॉइंट अजून नाहीच
नाहाटा महाविद्यालयासमोरील जागेवर एसटी महामंडळाने टचिंग पॉइंट उभारणीचे नियोजन केले होते. या बांधकामासाठी बीओटी तत्वावर मंजुरीदेखील मिळाली आहे. मात्र, वर्षभरानंतरही प्रत्यक्षात काम झाले नाही. यापूर्वी संरक्षण भिंतीचे काम मंजूर झाले होते. पण, कृतीचा अभाव आहे. टचिंग पॉइंट झाल्यास लांब पल्ल्याच्या बसेस शहराबाहेरुन जातील.

बसपोर्टचे नियोजन नाही
भुसावळात बसपोर्टबाबत अद्याप कोणतेही नियोजन नाही. नूतनीकरणाचा प्रस्ताव आम्ही मुख्यालयी पाठवला आहे. तर नाहाटा महाविद्यालय समोरील जागा बीओटी तत्वावर बांधकाम करण्यासाठी दिली आहे. या ठिकाणी आगामी काळात टचिंग पॉइंट होईल. बी.एस.जगनोरे, जिल्हा नियंत्रक, एसटी महामंडळ, जळगाव

बातम्या आणखी आहेत...