आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीला आळा:8 उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव‎ रवाना, गुन्हेगार पुन्हा रडारवर‎

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या‎ दुसऱ्याच दिवशी पोलिस प्रशासनाने‎ ८ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार‎ करून पोलिस अधीक्षकांकडे‎ मंजुरीसाठी पाठवले आहे. पालिका‎ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर‎ उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी या‎ हालचाली सुरू आहेत. शहरातील‎ वाढत्या गुन्हेगारीला आळा‎ बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने‎ कंबर कसली आहे. गुन्हेगारांचे‎ रेकॉर्ड काढून त्याद्वारे त्यांच्या‎ हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे‎ काम सुरू केले आहे. डीवायएसपी‎ साेमनाथ वाघचाैरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली शहरचे पोलिस‎ निरीक्षक गजानन पडघन,‎ बाजारपेठचे निरीक्षक राहुल‎ गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक‎ विलास शेंडे, नशिराबाद येथील‎ सहायक निरीक्षक अनिल माेरे यांनी‎ प्रस्ताव तयार करून पोलिस‎ अधीक्षकांकडे पाठवले आहेत.‎ यामुळे खळबळ उडाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...