आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेमुळे ब्रिटीशकालीन वसाहत असलेल्या भुसावळात सध्या ४० पेक्षा अधिक जीर्ण इमारती धोकेदायक असल्या तरी उभ्या आहेत. या इमारती पावसाळ्यात रस्त्यावरचे यमराज ठरू शकतात. पालिकेने गेल्या दोन वर्षांपासून जीर्ण इमारतींच्या मालकांना साधी नोटीसही बजावली नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच काय जीर्ण इमारतींसमोर धोक्याची सूचना देणारे फलक देखील नसल्याने पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती वाढली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही ब्रिटीशकालीन इमारती उभ्या आहेत. कालानुरुप जीर्ण झालेल्या या इमारती धोकेदायक झाल्या आहेत. अशा जीर्ण इमारतींमुळे कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही राज्यात घडल्या आहेत. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. अशा काळात जीर्ण इमारतींपासून त्यात वास्तव्य करणारे, परिसरात रहणाऱ्यांसह, ये-जा करणाऱ्यांना धोका होऊ शकतो. अशा जीर्ण मालमत्ता किंवा तिचा जीर्ण भाग पाडणे गरजेचे असते.
काय आहे नियमावली?
पालिका अधिनियम कलम १९५ नुसार भग्नावस्थेत किंवा पडण्याचा धोका असलेली इमारत ज्यामुळे जागेत राहणाऱ्या, आश्रय घेणाऱ्या किंवा तिच्या जवळून जाणाऱ्या येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस धोका असेल तर मालक किंवा भोगावटादारास पालिका ती काढून टाकणे, मजबूतीकरण करण्याची नोटीस देऊ शकते.
संबधित मालमत्ता किंवा भोगवटाधारक नोटीसनंतरही उपाययोजना करत नसेल तर पालिका अशी इमारत नष्ट करु शकते. याबाबतचा झालेला खर्च इमारतीच्या मालकाकडून किंवा भोगवटाधारकाकडून वसूल करता येते. यापोटी झालेला खर्च मालमत्ता कराची देय रक्कम या रितीनेही वसूल करता येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.