आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेध:जैन बांधवांचा तहसीलवर आक्रोश मोर्चा, सरकारच्या निर्णयाला विरोध

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धर्मांचे पवित्र तीर्थस्थळ सिद्ध क्षेत्र श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजी हे धर्मस्थळ आहे. तरीही पर्यावरण मंत्रालयाने या स्थळाला पर्यटनस्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन बांधवांनी गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत बुधवारी (दि.२१) आक्रोश मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदन देवून पर्यटनस्थळाचा दर्जा मागे घ्यावा अशी मागणी केली.

केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळ असा दर्जा देऊन इकोटुरिझम, लघुउद्योग, हॉटेल व रिसॉर्टची परवानगी अशा काही हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येऊ शकते. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी शहरातील सकल जैन समाजाने बुधवारी दुपारी तीन वाजता गांधी चौकापासून आक्रोश मोर्चा काढला. अप्सरा चौक, सराफा बाजार, नृसिंह चौक, जामनेर रोडमार्गे मोर्चेकरी तहसील कार्यालय गाठून निवेदन दिले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष पवनकुमार चोरडिया, उपाध्यक्ष अशोक डोसी, वसंत चतुर, रमेश अन्नदाते, व्यापारी जयंतीलाल सुराणा, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, सुगनचंद सुराणा, गौतम चोरडीया, कांती चोरडीया, बाळू सुराणा, संदीप देवडा, रवी निमाणी, चेतन जैन, जे.बी.कोटेचा, डॉ.संदीप जैन, पप्पू नाहार सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...