आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांविरूद्ध विभागात असंतोष:भुसावळ, वरणगाव, यावल, मुक्ताईनगर, बोदवडमध्ये आंदोलनातून निषेध

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्यप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोषारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात भुसावळ, यावल, वरणगाव, मुक्ताईनगर आदी ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर संघटनांनी आंदोलन केले. भुसावळ शहरात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गांधी पुतळ्याजवळ कोश्यारी, त्रिवेदी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध केला. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे, अशी मागणी केली. शहरप्रमुख दीपक धांडे, शहरप्रमुख हेमंत खंबायत, विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलेश महाजन, अॅड.कैलास लोखंडे, राकेश खरारे, स्वप्नील सावळे, सोनी ठाकूर, मनोज पवार, नबी पटेल, शेख महमूद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...