आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:नगरपालिका बांधकाम विभागाला‎ कायमस्वरुपी स्थापत्य अभियंता द्या‎

फैजपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपालिकेतील बांधकाम‎ विभागात कायमस्वरूपी स्थापत्य‎ अभियंता मिळावा या मागणीसाठी‎ शहरातील अभियंत्यांनी पालिकेचे‎ मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना‎ निवेदन दिले.‎ या निवेदनात सर्व अडचणींचा‎ उहापाेह करण्यात आला आहे.‎ शहरात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये‎ नवीन बांधकाम करताना परवानगी‎ घेणे बंधनकारक आहे.‎ परवानगीसाठी अर्ज दिल्यानंतर‎ बांधकाम विभागाकडून लवकर‎ परवानगी मिळत नाही.

बऱ्याच‎ काळापासून अनेक अर्ज प्रलंबित‎ आहेत. घराचे बांधकाम करणाऱ्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ग्राहकांना गृह कर्ज घेण्यासाठी‎ घराच्या बांधकामाला परवानगी‎ मिळणे आवश्यक असते.‎ बांधकामासाठी परवानगी हे‎ ऑनलाईन झाले आहे.‎ नगरपालिकेत दोन दिवस स्थापत्य‎ अभियंता असतात. मात्र तरीही पूर्ण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कामे होत नाहीत. त्यामुळे‎ कायमस्वरूपी स्थापत्य‎ अभियंत्याची बांधकाम विभागात‎ नेमणूक करावी, अशी मागणी‎ निवेदनातून केली अाहे.‎ मुख्याधिकारी लाेंढे यांना शुक्रवारी‎ हे निवेदन देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...