आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रावेर तालुका व जिल्ह्यातील इतर तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पावसाने केळी पिकाचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी रावेर तालुका भाजपने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
ऐन कापणीला आलेली केळी वादळामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यात शेतकऱ्यांना वादळाचा कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. पेरणीचे दिवस तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, राजन लासूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.