आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:आमदार टी.राजासिंगांना सुरक्षा पुरवा; हिंदू जनजागृती समिती

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोशा महल (तेलंगणा) येथील आमदार टी. राजासिंग यांना तत्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. येथील निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आमदार टी. राजासिंग यांना २३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथाच्या श्रद्धास्थानाचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात पुन्हा २५ ऑगस्ट रोजी आमदार टी. राजासिंग यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पीडीएफ अंतर्गत गुन्हा नोंद करून एक वर्ष कारागृहात अडकवण्याचा कट रचण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर जिहादी वृत्तीच्या धर्मांधांकडून त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवावी व त्यांना धमक्या देणाऱ्यांवर कठोर करावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...