आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रमजान काळात अखंड वीजपुरवठा करा, बोदवडला शिवसेनेचे महावितरण प्रशासनाला साकडे

बोदवड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात व तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. सध्या पवित्र रमजान पर्व आणि पवित्र चैत्र नवरात्रौत्सव सुरू आहे. या काळात अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रोजा ठेवणारे रोजेदार तसेच नवरात्रीचे उपवास करणाऱ्या साधकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बोदवड शहरात व तालुक्यात दररोज अचानक वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच पवित्र रमजान महिना सुरु असल्याने तीव्र तापमानामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे शहरात व तालुक्यात अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, कलीम शेख, नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक हाजी सईद बागवान, संजय गायकवाड, शहर प्रमुख हर्षल बडगुजर, शहर प्रमुख राहुल शर्मा, विभाग प्रमुख गोपाल पाटील, सादिक पटवे, दिनेश माळी, गोलू बरडीया, देवेंद्र खेवलकर, नितीन चव्हाण, सुनील बोरसे, नीलेश माळी, राजेश नानवाणी, अमीन टेलर, गफूर मंत्री, नाजिम पिंजारी, तौफीक पिंजारी, इमरान पटेल आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...