आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Bhusawal
  • Public Awareness About Yavalla Nutrition; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​| Marathi News

प्रभात फेरी:यावलला पोषण आहाराबाबत जनजागृती ; ​​​​​​​ एकात्मिक बालविकास प्रकल्पाने राबवलेला आदर्श उपक्रम

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सही पोषण देश रोशन या उपक्रमांतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून, अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारासंदर्भात जनजागृती मोहीम राबवली. बालक, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांनी कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे, या संदर्भात अंगणवाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रभात फेरी काढून याबाबत माहिती देण्यात आली.

एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग भुसावळ यांच्या माध्यमातून पोषण आहार संदर्भात जनजागृती केली जात आहे. शैलेजा रिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, नरेंद्र तायडे, अंगणवाडीच्या सेविका रेखा बारी, आरती चौधरी, पुष्पलता तळेले, छाया नन्नवरे, राजेंद्र सोनार, राजनंदनी पाटील यांनी यावल शहरात जनजागृती केली. अनेक भागात बॅनर आणि पोस्टर लावून प्रभाग निहाय प्रभात फेऱ्या काढल्या. घराघरापर्यंत जाऊन महिलांनी किशोरवयीन मुलींनी, स्तनदा माता, गरोदर माता आणि बालकांना कोणता आहार द्यायला पाहिजे या संदर्भात जनजागृती केली जात आहे. बालकांच्या आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.

बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे
कुटुंबातील बालकांना बाहेरील जंक फूड, कुरकुरे, चॉकलेटसह अन्य चटपटीत खाद्यपदार्थ पालकांनी टाळावे. त्यांना फळे, भाज्या, पालेभाज्या याचा आहार द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...