आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:तहसीलदार कुवर यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन; उदगीर येथील साहित्य संमेलनात झाला कार्यक्रम

यावल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तत्कालीन तहसीलदार तथा कवी जितेंद्र कुवर यांच्या पाऊसपर्ण कवितासंग्रहाचे उत्साहात प्रकाशन झाले. उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्याहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

नुकतेच अखिल भारतिय मराठी साहित्य महामंडळाचे ९५ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलन हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे घेण्यात आले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारत सासणे होते. साहित्य संमेलनात यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या पाऊसपर्ण कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

आबा महाजन, संदीप पाटील उपस्थित होते. तहसीलदार कुवर यांनी यापुर्वी लिहिलेल्या व्हाईट लिली या काव्यसंग्रहातील ‘तू एकदा पूर्वेचा’ या कवितेचा समावेश, नांदेड येथील स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मराठी व्दितीय भाषा आभ्यासक्रमात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या पदवी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात सन २०२०/२१ पासून केला आहे.

बातम्या आणखी आहेत...