आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारू:तीन गावठी दारू अड्ड्यांवर‎ छापे, पण संशयित पसार‎

यावल‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूर येथील डीवायएसपींचे‎ पथक तसेच यावल पोलिस पथकाने‎ शहर व तालुक्यातील अंजाळे, पिंप्री‎ गावात गावठी हातभट्टीवर छापे‎ टाकून ३२ हजारांचा मुद्देमाल‎ हस्तगत केला. या कारवाईत तीन‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.‎ मात्र, तिघे पोलिसांना पाहून पसार‎ होण्यात यशस्वी झाले.‎ डीवायएसपी डॉ. कुणाल‎ सोनवणे व यावल पोलिस निरीक्षक‎ राकेश मानगावकर यांना अंजाळे,‎ पिंप्री व शहरालगत गावठी‎ हातभट्टीची दारू विक्री होत‎ असल्याची माहिती मिळाली.‎ त्यानुसार सहायक फौजदार‎ अविनाश चौधरी, हवालदार दिलीप‎ तायडे, सुमित बाविस्कर यांनी‎ अंजाळे शिवारात छापा टाकला.‎

त्यात कैलास बळीराम सपकाळे‎ (रा.अंजाळे) हा हातभट्टीची दारू‎ गाळताना दिसला. मात्र, पोलिसांना‎ पाहून त्याने पळ काढला. तेथून १०‎ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल‎ हस्तगत करून कैलास सपकाळे‎ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎ आला. पोलिस निरीक्षक‎ मानगावकर यांच्या सूचनेनुसार‎ उपनिरीक्षक विनोद खांडबहाले,‎ सुशील घुगे, गणेश ढाकणे, गणेश‎ वाघ यांच्या पथकाने यावल-चोपडा‎ रस्त्यावर हडकाई नदीच्या‎ पुलाजवळ कारवाई केली. तेथे‎ भैय्या भगवान शिंदे हा गावठी‎ हातभट्टीची दारू गाळत होता.‎ त्याच्याकडून १२ हजार ५००‎ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात‎ आला. याच पथकाने पिंप्री शिवारात‎ नदीच्या काठावर छापा टाकला. तेथे‎ प्रकाश साळुंखे हा गावठी दारू‎ तयार करत होता. तो देखील पोलिस‎ पाहून पसार झाला.‎

बातम्या आणखी आहेत...