आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरी:रेल्वेचा ब्लॉक; लालपरी धावली मदतीला, नाशिकला जादा फेऱ्या

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे रेल्वेचा ब्लाॅक असल्याने अप-डाऊन मार्गावरील रेल्वे दळणवळणाला फटका बसला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ आगाराने नाशिक, धुळे व नागपूरसाठी विशेष जादा बसेस साेडल्या. नागपूर बस सकाळी ७, तर नाशिक बस पहाटे ४.३०, सकाळी ६ व ७ वाजता साेडण्यात आली. धुळेसाठी सकाळी ५.३० वाजता बस साेडल्याने नाशिकला जाणाऱ्यांची गैरसोय टळली.

आज महानगरी दादरहून सुटेल
शनिवारी (दि.१९) रात्री ११ ते रविवारी (दि.२०) रात्री २ वाजेपर्यंत ब्लॉक होता. यामुळे १५ गाड्या रद्द, तर २७ शॉर्ट टर्मिनेट केल्या होत्या. प्रवाशांना परतावा देण्यासाठी विविध स्थानकांवर रिफंड खिडक्या व मदत कक्ष उघडले होते. दरम्यान, सोमवारी पहाटे २ वाजेपासून गाड्या सुरूळीत झाल्या. दरम्यान, सोमवारी मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस दादर येथून सुटेल, असे प्रशासनाने सांगतले.

बातम्या आणखी आहेत...