आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची हुलकावणी:पिंपळगाव मंडळात पाऊस, कुऱ्ह्यात हुलकावणी

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहरात आतापर्यंत दमदार पावसाचे आगमन झाले नाही. मात्र, मंगळवारी रात्री भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव मंडळात ८४, वरणगाव परिसरात ५१, भुसावळ शहरात १५.६ मिमी पाऊस झाला. कुऱ्हा भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली. आतापर्यंत तालुक्यात अवघा ६४ मिमी पाऊस झाला आहे. असे असले तरी रविवार नंतर (दि.२६) मान्सूनची सक्रियता वाढेल, असा अंदाज आहे.

सध्या भुसावळचे तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान आहे. यामुळे मान्सून अधिक सक्रिय नव्हता. शुक्रवारी भुसावळसह विभागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. रविवारनंतर मान्सून अधिक सक्रिय होऊ शकेल, असा अंदाज वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांनी वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...