आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यापासून पाऊस उघडला:पावसाची दांडी, तापमानाचा पारा 35 अंशांवर

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह विभागात गेल्या आठवड्यापासून पाऊस नाही, दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. श्रावणात जणू भाद्रपद महिन्यातील पितृपक्षाप्रमाणे कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. तीन दिवसांपासून तर शहराचे कमाल तापमान पाच अंशांनी वाढून ३५ पर्यंत गेले. किमान तापमान २५ अंशांवर आहे. कमाल व किमान तापमानात केवळ दहा अंशांची तफावत आहे.उन्हाचा तडाख्यासोबतच उकाडा वाढल्याने घरोघरी पुन्हा एकदा कुलरचा वापर सुरू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...