आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर जागोजागी पाणी:खडका रोडवर साचले पावसाच्या पाण्याचे तळे

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे खडका रोडच्या चार महिन्यांपूर्वीच झालेल्या रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो.

शहरात गुरुवारी रात्री उशिराने जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यात खडका रोड या मुख्य रस्त्यावर पाणी साचले. खडका रोडच्या या रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. मात्र, पाण्याचा निचरा व्हावा या पद्धतीने उतार नाही. त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी पाणी साचते. त्यात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने जीवघेणा अपघात देखील होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...