आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा ठसका:रायपूरची हिरवी मिरची भुसावळ बाजारात खातेय भाव; 100 ते 150 रुपये दर, कोथिंबीरही 80 रुपये किलो

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तापमान वाढताच आवक कमी होऊन बाजारातील भाजीपाल्याचे दर वाढले

उन्हाळ्याला सुरूवात होताच भाजीपाल्याच्या दरवाढीला सुरूवात झाली आहे. त्यात हिरव्या मिरचीचे भाव तब्बल १५० रूपये किलोपर्यंत पोहोचले आहे. रायपूर येथील मिरची दाखल होऊनही चढे दर कायम आहेत. अन्य भाजीपाल्याचे भाव देखील किलोमागे सरासरी १० ते २० रुपयांनी वाढले आहेत.

गेल्या आठवडे बाजारात हिरव्या भाजीपाल्याचे दर सरासरी ६० रूपये किलोपर्यंत होते. हाच भाजीपाला २० मार्चला ८० रूपये किलोपर्यंत पोहोचला. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. शिवाय मध्यंतरी अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले. यामुळे स्थानिक भाजीपाला बाजारात येण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचेही परिणाम देखील भाव वाढीत झाले आहेत. त्यात प्रामुख्याने हिरवी मिरची १०० ते १५० रूपये किलो, कोथिंबीर ८० रूपये, मेथी ८०, पालक ६०, टमाटे २०, भेंडी ६० ते ८०, कोबी ६०, गाजर ४०, वांगे ४०, कांदे ३०, बटाटा २० रूपये, शेवगा शेंग ५० ते ६०, गिलके ६० ते ८०, ढेमसे ६० ते ८०, दोडके ६० रूपये किलो असे दर होते.

लांब अंतरावरून वाहतुकीमुळे दरावर परिणाम अवकाळीचाही फटका
तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्यात रायपूरसह गुजरातमधून मिरची भुसावळात विक्रीला येत आहे. लांब अंतरासाठी वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे भाव वाढतात. योगेश मराठे, विक्रेता, भुसावळ

उन्हाळ्यात महिला बटाट्याचे वेफर्स तयार करतात. सध्या बाजारात बटाट्यांना २० रूपये किलोचा भाव असला तरी वेफर्स करता येतील, असे बटाटे अद्याप बाजारात दिसले नाही. दीपाली सालकर, गृहिणी, भुसावळ

वाढलेले दर पाहता हिरवा भाजीपाला खरेदी करावा किंवा नाही? असा प्रश्न पडतो. त्यात आम्ही शहरापासून लांब राहतो. त्यामुळे बाजारात येण्यासाठी होणारा खर्च परवडत नाही. प्रगती भोळे, गृहिणी, भुसावळ

बाजारापेक्षा दारोदार विक्रीला येणारा भाजीपाला पाच ते दहा रुपयांनी महाग मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे किचनचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. हर्षाली जाधव, गृहिणी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...