आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुमदुमली व्यास नगरी:रामनामाने दुमदुमली व्यास नगरी; दिवसभर भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

यावलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात श्री राम, जय राम!, जय जय राम,!! अशा स्वरांनी रविवारी व्यास नगरी दुमदुमली होती. दोन वर्षांपासून काेरोना कोरोनाच्या संकटात सार्वजनिक कार्यक्रम बंद होते. यंदा कोरोनाचे संकट टळल्याने शहरातील तिन्ही मंदिरात उत्साह दिसून आला. शहरातील कोहळेश्वर राम मंदिर, महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिर व सातोद रस्त्यावरील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवानिमित्त शास्त्रोक्त पद्धतीनेे पूजा संपन्न झाली व प्रसाद वितरण करण्यात आले.

शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्री शनी मंदिरातील पेठचे श्रीराम मंदिरात सकाळ पासूनच श्रीराम नामाच्या किर्तनाने लक्ष वेधले होते. पारंपारिक पद्धतीने येथे रूपचंद घारू, कमलाकर घारू, हेमराज घारू यांनी व भजनी मंडळाने किर्तन सादर केले. दुपारी १२ वाजेला पुजारी पप्पु महाराज जोशी यांच्या हस्ते पुजा करून आरती झाली.

तसेच शहरातील वाणी गल्लीतील श्री कोहळेश्वर राम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. महाआरती व जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला. यात सकाळी मूर्तीला महाभिषेक करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापिका विद्या सरोदे यांचे प्रवचन झाले. प्रवचन झाल्यावर महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मंदिरात महाअभिषेक शुभम गडे व कामिनी गडे या दाम्पत्याच्या हस्ते तर आरती दिलीप प्रकाश यांच्याहस्ते पार पडली. संपुर्ण धार्मिक विधी पुरोहित अतुल महाराज बाविसे यांनी पार पाडले. श्री महर्षी व्यास मंदिरातील श्रीराम मंदिरातदेखील श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.