आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव साजरा:जे.टी.महाजन स्कूलमध्ये रंगला गणेशोत्सव

फैजपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपार्वती नंदन गणपतीचे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सर्वांनीच मोठ्या थाटामाटात स्वागत केले. घराघरांतून गल्लीबोळांपर्यंत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल, फैजपूर येथे गणेशोत्सव साजरा होत आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमार्फत श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.

यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक विजेंद्र सोनार यांनी आपल्या मनोगतातून गणेश चतुर्थी विषयी विशेष माहिती दिली. सोबतच लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू समजून घ्यावा असे आवाहन केले. यानंतर विद्यालयातील पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी एक तरी मोदक हे गीत सादर केले. दुसऱ्या गटाने माझा बाप्पा किती गोड दिसतो हे गीत गायन केले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओ माय फ्रेंड गणेशा या गीतावर नृत्य केले. गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून गणेश कथांचे श्रवण या अंतर्गत विद्यालयाच्या उपशिक्षिका स्वाती परदेशी यांनी एकदंताची कथा सांगितली. प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पूनम नेहेते यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...