आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रम:रोज पेटल्स स्कूलमध्ये‎ रंगला सांस्कृतिक कार्यक्रम‎

बोदवड‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रोज पेटल्स इंग्लिश मीडियम‎ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध‎ कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम‎ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी‎ संस्थेचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल होते.‎ विद्यार्थ्यांनी एकूण २६ प्रकारची विविध‎ नृत्ये सादर केली.‎ कार्यक्रमाची सुरुवात ‘गणेश वंदना व‎ आरंभ है प्रचंड’ या गीतांवर नृत्याने झाली.‎ पूर्व प्राथमिक गटातील चिमुकल्यांनी ‘मुझे‎ माफ करना ओम साई राम’ व गोविंदा‎ स्पेशल, दक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध‎ टमटम हे गाणे सादर करून उपस्थितांची‎ मने जिंकली.

देशभक्तीवरील नृत्याने‎ कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे सचिव‎ विकास कोटेचा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक‎ केले. संचालक श्रीराम बडगुजर, आनंद‎ जयस्वाल, रमेश जैन, विजय जैन,‎ मुख्याध्यापक पी.एम.पाटील,‎ मुख्याध्यापिका रंजना काठोके, प्रगती‎ बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुनीता‎ पाटील, रोज पेट्लस शाळेचे मुख्याध्यापक‎ अरविंद वाघ व पालक मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...