आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:रणजितसिंग राजपूत फिट इंडियाचे अॅम्बेसेडर

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबवले जाणारे, फिट इंडिया अभियान तळागाळापर्यंत पोहोचावे या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारतर्फे भुसावळातील रणजितसिंग राजपूत यांची फिट इंडिया अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने फिट इंडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया व स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई)तर्फे देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण व तरुणींची निवड केलेली आहे. रणजितसिंग राजपूत यांना एकता विश्नोई भा.रा.से.(फिट इंडिया मिशन निदेशक, भारत सरकार) यांच्या वतीने फिट इंडिया अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाले. रणजितसिंग राजपूत यांनी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने, राज्य निदेशक प्रकाश मनुरे व जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली फिट इंडिया अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रम घेऊन जिल्हा स्तरावर कार्य केले आहे. दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकांनी स्वतःला आरोग्य संपन्न ठेवावे. हा या मोहिमेचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...