आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:यावलमध्ये आज रावण दहनाचा कार्यक्रम होणार ; दशमीला रावण दहनाचे आयोजन

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाने परंपरेनुसार विजया दशमीला रावण दहनाचे आयोजन केले आहे. महर्षी व्यास मंदिराजवळ हडकाई-खडकाई नदीच्या संगमाजवळ आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते रावण दहन होईल. अध्यक्षस्थानी श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, तर प्रांत कैलास कडलग, डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार महेश पवार, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, मुख्याधिकारी मनोज म्हसे, बीडीओ एकनाथ चौधरी आदी उपस्थित राहतील. आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, अमोल दुसाने, डॉ. हेमंत येवले, विवेक देवरे, प्रभाकर वाणी, अमोल भिरुड, अरुण लोखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...