आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:अर्धनग्न होऊन रावेर पोलिसांचा केला निषेध; तक्रार करण्यासाठी आल्यावर मारहाणीचा आरोप

रावेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

घराजवळील गटार तुंबली म्हणून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी आलेल्या अहिरवाडी येथील तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली. यामुळे त्याने पोलिस ठाण्याबाहेरील रस्त्यावर अर्धा तास अर्ध नग्न होत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांवर तोंडसुख घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

अहिरवाडी येथील मंगल राजपूत या तरुणाच्या घराजवळील गटारीतील सांडपाण्यावरून वाद झाले. ही तक्रार देण्यासाठी तो दुपारी ३ वाजता रावेर पोलिस ठाण्यात आला. मात्र, पोलिसांनी तक्रार न घेता उलट मारहाण केली. याचा निषेध म्हणून राजपूतने सायंकाळी ५ वाजता अर्ध नग्न होत पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर झोपून ठिय्या आंदोलन केले. यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. पोलिस कर्मचारी विजू जावरे, सुनील वंजारी यांनी राजपूतला रस्त्यावरून हलवून पोलिस ठाण्यात नेले. यानंतर दोन तासांनी त्याला अहिरवाडीला घरी पोहोचवल्याचे पोलिसांनी सांगितले.