आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पुरस्कार जाहीर:रावेर तालुका शाळा; शिक्षक गौरव समिती पुरस्कार घोषित

रावेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीकडून दरवर्षी देण्यात येणारे शाळा आणि शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात यंदाचा आदर्श शाळा पुरस्कार तालुक्यातील अहिरवाडी येथील प्रकाश शामू चौधरी माध्यमिक विद्यालयास जाहीर झाला आहे.निवड समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत शिक्षक पुरस्कार देखील घोषित करण्यात आले.

त्यात ललित नानकसिंग पवार (उपशिक्षक, सरदार जी. जी.हायस्कूल, रावेर), जयंत रमेश पाटील (उपशिक्षक, प्रकाश विद्यालय, मोठे वाघोदे), रामदास हिरामण पाटील (उपशिक्षक, ज्ञानगंगा विद्यालय, रायपूर), शैलेश गंभीर सूर्यवंशी (उपशिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल, निंभोरा), शेख सईद शेख ताहेर (उपशिक्षक, अँग्लो उर्दू हायस्कूल, सावदा) या शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार वितरण १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता अहिरवाडी येथील विद्यालयात संबंधितांना देण्यात येतील. शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना, समितीच्या माध्यमातून गौरवले जाते.

बातम्या आणखी आहेत...