आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:रावेरातील गर्ल्स हायस्कूल, सरदार जी.जी. हायस्कूलचे विद्यार्थी चमकले

रावेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमलाबाई एस.अगरवाल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९६.३५ टक्के लालगला. तेजल बाळू महाजन हिला ८६.५९ टक्के गुणांसह पहिली आली. वैष्णवी मनोज सोनारला ८६ टक्के गुणांसह व्दितीय तर माधुरी मुकेश भरणे हिला ८५.५३ टक्के गुण मिळाल्याने तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

सरदार जी.जी.हायस्कूल
या शाळेचा बारावीचा निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून गायत्री वाणी ही ९३.१७ टक्के गुण मिळाल्याने प्रथम आली आहे. मोहीत राणे हा ९०टक्के गुण मिळाल्याने द्वितीय तर यश बोरा ८७.८३ टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

वाणिज्य शाखेतून शिवम गडे याला ८६.८३ टक्के गुण मिळाल्याने प्रथम, नुकुल महाजन याला ८५.५० टक्के गुण मिळाल्याने द्वितीय तर प्रेरणा गडे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिला ८४.६७ टक्के गुण मिळाले आहे. कला शाखेतून ७०.८३ टक्के गुण मिळाल्याने हर्षल महाजन प्रथम तर ६९.६७ टक्के गुण मिळाल्याने दीपक देशमुख द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...