आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:रावेरात सर्वाधिक 7, फैजपूर 4, वरणगाव, सावदा प्रत्येकी 3, भुसावळ, यावल 2 नगरसेवक वाढले

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रारूप प्रभाग रचनेला सुरूवात झाल्यापासून केळीपट्ट्यातील महत्त्वाच्या सहा पालिका शहरातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या प्रारूप रचनेवर मागवलेल्या सर्व हरकती सुनावणीअंती फेटाळल्या गेल्या. यानंतर गुरुवारी अंतिम प्रभाग रचनेवर मंजुरीची मोहोर उमटली. यानुसार सर्वाधिक ७ नगरसेवक रावेर पालिका, फैजपूर ४, वरणगाव, सावद्यात प्रत्येकी ३, तर भुसावळ व यावल येथे प्रत्येकी २ नगरसेवक वाढले. प्रभागांची भौगोलिक स्थिती स्पष्ट झाल्यानंतर आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने जमिनीवर राजकीय लढाईला सुरुवात होईल. कारण, आरक्षण सोडत होताच कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा अंदाज आहे.

भुसावळात आता एकूण २५ प्रभाग

भुसावळ भुसावळ पालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेत शहराच्या राजकारणावर परिणाम होतील असे दखलपात्र बदल झालेले नाहीत. केवळ २४ ऐवजी २५ प्रभाग तयार होऊन नगरसेवकांची संख्या दोनने वाढून ४८ ऐवजी ५० झाली. प्रारुप रचनेवर दाखल सर्व हरकती फेटाळल्या. विशेष म्हणजे कोणाचीही मागणी नसताना प्रभाग २० मधील ब्लॉक क्रमांक २५९ हा हनुमान नगरातील ४५७ लोकसंख्येचा भाग वगळून प्रभाग २५मध्ये जोडला गेला. यापूर्वी १० मार्चला पालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली होती. त्यावर हरकतींचा कार्यक्रम सुरू असताना या प्रक्रियेला ब्रेक लागला होता. यानंतर १० मे पासून पुन्हा हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यासाठी दिलेल्या मुदतीत भुसावळातून विविध ८१ हरकती दाखल करण्यात आल्या. त्या सर्व फेटाळून अंतिम रचना जाहीर झाली. त्यानुसार पालिकेची प्रभाग संख्या १ने वाढून २४ ऐवजी २५, तर नगरसेवकांची संख्या दोनने वाढून ४८ ऐवजी ५० झाली. जुन्या प्रभागांची मोडतोड करून नवीन प्रभाग आकारास आला. दरम्यान, नवीन प्रभाग रचना गुरूवारी पालिका कार्यालयात सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली. त्याचे अवलोकलन करण्यासाठी पालिकेत गर्दी झाली होती.

४ व १०मध्ये तोडफोड करून असा झाला नवीन प्रभाग भुसावळच्या नवीन प्रभाग रचनेत जुना ४ व जुना १० नंबरच्या प्रभागातील काही भाग बाजूला करून नवीन नवीन प्रभाग तयार करण्यात आला. यात हद्दीवाली चाळ, डीआरएम कार्यालय परिसर, पाेलिस वसाहत, न्यायालयामागील परिसर ते आेंकारेश्वर मंदिरापर्यंतचा भाग या नवीन प्रभागात जोडला आहे.

केळीपट्ट्यातील चित्र असे रावेर : रावेर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल सर्व १५ हरकती फेटाळून या रचनेला अंतिम मान्यता मिळाली. नवीन रचनेनुसार १२ प्रभागांतून २४ नगरसेवक निवडून जातील. यावल : अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. त्यात शहरात पूर्वीच्या तुलनेत १ प्रभाग व २ नगरसेवक वाढले. आता शहरातील ११ प्रभागातून २३ नगरसेवक विजयी होतील. सावदा : येथील पालिकेची प्रभाग संख्या दोनने वाढून ८ ऐवजी १० झाली. शिवाय नगरसेवक संख्या ३ ने वाढून १७ ऐवजी २० झाली आहे. आता प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक असतील. फैजपूर : सर्व २३ हरकती सुनावणीअंती फेटाळल्या गेल्या. अंतिम रचेनुसार आता १० प्रभागातून एकूण २१ नगरसेवक निवडून जातील. ९ प्रभागात प्रत्येकी २ व एका प्रभागात ३ नगरसेवक असतील. वरणगाव : पालिकेचा १ प्रभाग वाढून त्यांची संख्या ९ ऐवजी १० झाली. पूर्वी ९ वॉर्डातून १८ नगरसेवक विजयी झाले होते. आता १० प्रभागातून २१ नगरसेवक निवडले जातील.

बातम्या आणखी आहेत...