आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकांची आरक्षण सोडत:रावेरला पालिकेत 24 पैकी 3 जागा  आरक्षित; एकूण 12 महिलांना संधी

रावेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर पालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी आरक्षण सोडत निघाली. त्यात प्रभाग ५ अ मध्ये अनुसूचित जाती महिला, प्रभाग ११ ब मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण व प्रभाग १० अ अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण निघाले. याशिवाय उर्वरीत सर्व प्रभागातील पहिल्या (अ) जागेसाठी महिला सर्वसाधारण, तर दुसऱ्या (ब) जागेसाठी सर्वसाधारण असे आरक्षण निघाले. या आरक्षण सोडतीचा राजकीय जाणकार बारकाईने अभ्यास करत आहे.

येथील पालिकेच्या आठवडे बाजारातील सभागृहात जळगावचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे उपस्थित होत्या. रावेर पालिकेच्या नगरसेवक पदांच्या एकूण २४ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यापैकी बारा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून बारा जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोडण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती व जमाती जागांसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सन २०११ च्या जनगणनेनुसार उतरत क्रम लावून आरक्षण काढण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, पद्माकर महाजन, प्रल्हाद महाजन, शीतल पाटील, राजेंद्र चौधरी, रवींद्र पवार, आसिफ मोहंमद, योगेश गजरे, भास्कर महाजन, गयास शेख, मेहमूद शेख, युनूस खान, बाळू शिरतुरे, डी.डी.वाणी, जगदीश घेटे, उमेश महाजन, अरूण शिंदे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...