आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्याख्यानांचे शतक पूर्ण करणारी रावेरची रंगपंचमी व्याख्यानमाला

रावेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपासून 5 दिवस शहर परिसरात होणार विचारांचा जागर

व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचारांचा जागर करीत शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांच्या मनामनात सकारात्मक विचार रुजवणाऱ्या येथील रंगपंचमी व्याख्यानमालेला बुधवार पासून सुरूवात होत आहे. व्याख्यानमालेचा पाच दिवसांचा विचारांचा जागर नाशिकचे उप जिल्हाधिकारी बबनराव काकडे यांच्या व्याख्यानाने सुरु होणार आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे हे २०वे वर्ष आहे. याच बरोबर व्याख्यानांचे शतक पूर्ण करणारी बाब या व्याख्यानमालेची प्रतिष्ठा व प्रतिभा संपन्नता वाढवणारी आहे.

रावेर तालुक्याला आर्थिक संपन्नतेबरोबर ज्ञान आणि विचारांचीही परंपरा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव या दोन्ही उत्सवांच्या निमित्ताने शहरात अनेक प्रबोधन व जनजागृती पर कार्यक्रम होतात. सन २००० पासून रंगपंचमी व्याख्यानमालेला शहरात सुरुवात झाली.

येथील सरदार जी.जी. हायस्कूलच्या प्रांगणात बुधवारपासून सुरू होणाऱ्या व्याख्यानमालेत नाशिकचे उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे हे ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर पाहिले विचार पुष्प गुंफतील. गुरुवारी नागपूरच्या शिवाली देशपांडे या ‘सैनिकांचे जीवन’ यावर दुसरे पुष्प, शुक्रवारी पुणे येथील गणेश शिंदे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर तिसरे विचार पुष्प गुंफतील. शनिवारी जळगाव जामोदचे अंबरीश पुंडलिक हे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट’ चौथ्या विचार पुष्पातून मांडतील.

तर समारोप महाड येथील शीतल मालुसरे करतील. त्या नरवीर तानाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास उलगडतील. यशस्वितेसाठी विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष अनिल महाजन, सचिव कैलास वानखेडे व कार्यकारिणीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...