आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नाफेडद्वारे हमीभावात‎ हरभरा खरेदीसाठी नोंदणी‎

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎नाफेडच्या माध्यमातून शासकीय‎ हमीभावाने हरभरा खरेदीसाठी‎ भुसावळ तालुका शेतकरी संघात‎ नोंदणी सुरू करण्यात आली आहे.‎ बुधवारपासून ही नोंदणी सुरु झाली‎ आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रात‎ नोंदणी करावी, असे आवाहन केले‎ आहे.‎ भुसावळ तालुका शेतकरी‎ सहकारी संघात शासकीय‎ हमीभावात हरभऱ्याची खरेदी केली‎ जाणार आहे.

हरभऱ्याला‎ प्रतिक्विंटल ५३३५ रुपये हमीभाव‎ मिळणार आहे. नोंदणीसाठी‎ शेतकऱ्यांना २०२२/२३ या वर्षाचा‎ हरभरा पिकाची नोंद असलेला व‎ तलाठी यांची स्वाक्षरी असलेला‎ ७/१२ उतारा किंवा डिजिटल‎ स्वाक्षरी असलेला ऑनलाइन उतारा‎ आवश्यक असेल. यासोबतच‎ आधार कार्ड, बँक पासबुकच्या‎ स्पष्ट झेरॉक्स प्रती सादर कराव्या‎ लागतील. शेतकऱ्यांनी नोंदणी‎ करावी, असे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...