आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:मॉडर्नरोड वाहतुकीसाठी खुला झाल्याने दिलासा‎

भुसावळ‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मॉडर्नरोडवरील डॉ.‎ आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी‎ चौक या रस्त्यावर पेव्हर ब्लॉकचे‎ काम पूर्ण झाले. त्यामुळे रविवारी‎ सकाळपासून हा रस्ता‎ वाहतुकीसाठी खुला झाला. गेल्या‎ चार वर्षांपासून खड्डेमय असलेला‎ हा रस्ता चकाचक झाल्याने व्यापारी‎ व ग्राहकांना दिलासा मिळाला.‎

गेल्या तीन वर्षांपासून विशेष रस्ता‎ अनुदानातून केवळ बीबीएम करुन‎ या रस्त्याचे काम थांबले होते.‎ पालिकेने २०२० मध्ये १२‎ कोटींच्या निधीतून होणाऱ्या रस्ते‎ विकास कामात मॉडर्नरोडचा‎ समावेश केला होता. या रस्त्याचे‎ बीबीएम झाल्यानंतर काम‎ रखडल्याने विनोद जैन यांनी रस्ते‎ प्राधिकरण न्यायालयात तक्रार‎ देखील केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...