आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकलूद, ता. यावल येथील गट क्रमांक ६८/३ साठी दिलेला आदेश रद्द करुन झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे, रमाईनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे व पाडळसे येथील मोजणी आकारणी फी शासनामार्फत भरण्यात यावी, या मागण्यांसाठी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूूर्यवंशी यांच्या नेतृत्वात प्रांत कार्यालयावर मोेर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
अकलूद येेथील सरकारी गट क्रमांक ६८/३ ही दोन हेक्टर जागा अर्चना नरेंद्र महाजन यांना शेती उत्पादनासाठी देण्यात आली आहे. परंतु ही जमीन गायरान असून खडकाळ आहे. या जमिनीवर कोणतेही पीक घेवू शकत नाही. यामुळे जमिनीचा ठराव चुकीचा करण्यात आला. शासनाची जमीन बळकावण्याचा हा प्रयत्न आहे. या जमिनीवर गेल्या ५० वर्षांपासून भिल, वडार, तडवी समाज अतिक्रमण करुन राहत आहे.
त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, त्या ठिकाणी ३०० अतिक्रमित कुटुंबे राहत असून या आदेशामुळे २ हजार लोकांना बेघर व्हावे लागेल. तसेच रमाबाई आंबेडकर नगर ही झोपडपट्टी ५० वर्षांपासून आहे. तेथे ४०० कुटुंबे राहतात. त्यांना बेघर करु नये तसेच पाडळसे गावातील अतिक्रमण धारकांच्या मोजणीसाठी शासनाने दिलेले आकारणी शुल्क शासनाने भरावे, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी झोपडपट्टी रहिवाशांसह अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, राहुल इंगळे, शांताराम तायडे, सुनील तायडे, पप्पू भालेराव, राजू तडवी, विष्णू पारधे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.